ॲलिम्को साहित्य वितरण समग्र शिक्षा पंचायत समिती, मलकापूर



ॲलिम्को साहित्य वितरण समग्र शिक्षा पंचायत समिती, मलकापूर

आज 12 जून 2026 मलकापूर येथे समग्र शिक्षा पंचायत समिती, मलकापूर यांच्या वतीने समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलत ॲलिम्को साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.साहित्य वितरण करतांना मा.आ.चैनसूखजी संचेती व दिव्यांग विद्यार्थ्यांनी कु.आंचल अंबादास सुशिर (स्व.आबासाहेब देशमुख विद्यालय,वडोदा.) सदर विद्यार्थ्यांनी ही मूकबधिर व कर्णबधिर आहे.



अलिम्को काय आहे?

ALIMCO (अलिम्को) चा फुल फॉर्म Artificial Limbs Manufacturing Corporation of India असा आहे. ही भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक ना-नफा सरकारी कंपनी आहे.मराठीमध्ये याला भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम असे म्हणतात.ALIMCO ची मुख्य कामे:कृत्रिम अवयवांची निर्मिती: दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कृत्रिम हात-पाय (Prosthetics), व्हीलचेअर, श्रवणयंत्रे (Hearing aids) आणि इतर आवश्यक साहित्याची निर्मिती करणे.योग्य दरात वितरण: हे सर्व साहित्य वाजवी आणि परवडणाऱ्या दरात किंवा सरकारी योजनांमधून मोफत दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचवणे.सरकारी योजनांची अंमलबजावणी: ही संस्था भारत सरकारच्या ADIP आणि RVY (राष्ट्रीय वयोश्री योजना) यांसारख्या प्रमुख योजना राबवते.PMD-VK केंद्र: नागरिकांना घरच्या जवळ सेवा मिळावी म्हणून देशभरात 'प्रधानमंत्री दिव्याशा-वयोश्री केंद्र' (PMD-VK) चालवले जातात.



Post a Comment

0 Comments