लोकमान्य टिळक जयंती - 23 जुलै 2026

 

🌹 लोकमान्य टिळक जयंती 🌹

आज विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली.मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर मानकर सर प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून तसेच सर्व शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. श्री.अविनाश चव्हाण सर यांनी लोकमान्य टिळक  यांचे जीवन व महान कार्याविषयी विद्यार्थ्यांना संबोधित केले.


"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!"


भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महान प्रेरणास्थान, प्रखर राष्ट्रवादी, समाजजागृतीचे पुरस्कर्ते, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि जननेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!


सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवांच्या माध्यमातून त्यांनी जनतेमध्ये राष्ट्रप्रेम, एकता आणि स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना जागृत केली. त्यांचे विचार, कार्य आणि देशभक्ती आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत आहेत.


लोकमान्य टिळक जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन!

Post a Comment

0 Comments