स्व.आबासाहेब देशमुख विद्यालय,वडोदा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
स्व.आबासाहेब देशमुख विद्यालय,वडोदा येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय भाऊसाहेब नारखेडे सर लाभले.
कार्यक्रमादरम्यान भाऊसाहेब नारखेडे सर, मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर मानकर सर, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्साहाने विविध वृक्षांची लागवड केली. यावेळी भाऊसाहेब नारखेडे सर यांनी वृक्षांचे पर्यावरणातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे जतन व संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपणात उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यालय परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या सहभागामुळे यशस्वीरीत्या पार पडला.

0 Comments
शालेय उपक्रम व माहिती