स्व. आबासाहेब देशमुख विद्यालयाने 96.66% निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले. पवन पुंडलिक गायकवाड याने 84.40% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला असून, रोशनी गजानन गायकवाड व साहिल हरिदास गायकवाड यांनी 84.20% गुणांसह संयुक्त द्वितीय, सुपेश ज्ञानेश्वर हिवरखेडे 84.00% गुणांसह तृतीय, आशिष बबन तायडे 83.00% गुणांसह चतुर्थ तर श्रद्धा प्रदीप हिवरखेडे हिने 82.40% गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला आहे.
विषयवार नैपुण्यात तुषार सदाशिव गायकवाड याने विज्ञान विषयात 100 पैकी 93 गुण तर पायल महादेव गायकवाड हिने गणित विषयात 91 गुण व करिष्मा अशोक वानखेडे हिने सामाजिक शास्र विषयात 90 मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदाने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
🌹 सर्व विद्यार्थांचा गुणगौरव करतांना मुख्याध्यापक ,शिक्षक व कर्मचारी वृंद 🌹

.jpg)
0 Comments
शालेय उपक्रम व माहिती